Lokmat Crime News | आता न्यायालय सुद्धा सुरक्षित नाही | चोरांनी न्यायालयाची स्ट्राँग रुमच फोडली

2021-09-13 1,198 Dailymotion

Download Convert to MP3

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालया तील स्ट्राँग रूम फोडून चोरट्यांनी सोन्यावर डल्ला मारला. खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला आणि सोनं लंपास केलं.विशेष म्हणजे अंबाजोगाई शहरातील योगेश्‍वरी देवीच्या अंगावरील सोने चोरीला गेलं होतं. पोलिसांनी तपासा दरम्यान ते सोनं हस्तगत केलं आणि ते न्यायालयामध्ये ठेवण्यात आलं होतं. त्याच सोन्यावर चोरट्यांनी पुन्हा एकदा डल्ला मारला.चोरट्यांनी फोडलेल्या स्ट्राँग रुममध्ये काही बँकेच्या एफडी चेकबुक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योगेश्‍वरी देवीच्या अंगावरील चोरीला गेलेले दागिने होते. न्यायालयही सुरक्षित नसल्याने सर्व सामान्यांचं काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews