आता मालदिव हा देश सुद्धा चीनच्या जाळ्यात, तरी भारत झोपलेलाच ! | Lokmat Mararthi News

2021-09-13 0 Dailymotion

Download Convert to MP3

चीनच्या बेल्ट अॅन्ड रोड इनिशिएटीवचा भाग असलेल्या सागरी रेशीम मार्गाच्या योजनेला पुढे सरकावताना चीनने मालदिवबरोबर महत्वाचा करार केला. चीनच्या या योजनेला भारताचा तीव्र विरोध असतानासुद्धा मालदिवबरोबर करार करण्यात चीन यशस्वी झालाय. मुक्त व्यापार कराराबरोबरच चीन आणि मालदिवमध्ये 12 इतर महत्वाचे करार झाले आहेत.
यात मध्य आशियातल्या देशां मधून रस्ते बांधणी करत युरोपला चीनशी जोडून घ्यायची योजना आहे.कारण आता बहुतांश व्यापार हा समुद्र मार्गानेच होतो. हिंदी महासागरातून आखाता मार्गे युरोपला चीनशी जोडण्याचं काम सागरी रेशीम मार्ग करतो.चीनने सागरी रेशीम मार्गाची योजना यशस्वी करण्यासाठी श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, पूर्व आफ्रिकन देश, इंडोनेशिया आणि इतर काही लहान देशांशी मोठे करार करत त्या देशांमध्ये अब्जावधींची गुंतवणुक केली आहे. मालदिव ही हिंद महासागरातील भारताच्या दक्षिणेला असलेली महत्वाची बेटं आहेत. त्याचं व्यापारी आणि त्याहून महत्वाचं म्हणजे नौदलाच्या डावपेचांच्या दृष्टिकोनातून प्रचंड महत्व आहे. चीन आधी व्यापारी करार करतो आणि नंतर तिथे छुपे लष्करी तळ उभारतो. हे माहीत असूनसुद्धा भारत एकएक शेजारी गमावत चालला आहे. वास्तविक पाहता भारतानेच मोठ्या भावाच्या भूमिकेतून आधीच या देशांमध्ये गुंतवणुक करायला हवी होती. परंतु नेहमीप्रमाणेच आपण झोपलेले आहोत. याची किंमत आपल्याला भविष्यात मोजावी लागेल हे निश्चित.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews